अखेर वर्षभरानंतर वाडा मार्गे पुणे-भिमाशंकर एस.टी बस सुरू.

  • अखेर वर्षभरानंतर वाडा मार्गे पुणे-भिमाशंकर एस.टी बस सुरू.
    वाडा दि. २७ प्रतिनिधी
    भिमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असून अनेकांचे श्रध्दास्थान आहे. कोरोना काळात अनेक दिवस बंद असलेली पुणे – वाडा मार्गे भीमाशंकर अशी एस.टी बस सेवा बराच काळ बंद होती. त्यामुळे ही बस सेवा बंद असल्याने अनेक प्रवाशांना त्याचा खुप मोठा त्रास सहन करावा लागत होता. खेड तालुक्याचे पश्चिम भागतील गांवमधील अनेक लोक नोकरी निमित्त पुणे येथे जात – येत असल्याने त्याना या एस.टी बसचा खुप मोठा फायदा होणार आहे. ही एस.टी बस सेवा पुणे शिवाजीनगर आगारातुन चालु असून ही सेवा सकाळी ७ वाजता शिवाजी नगर पुणे येथून खेड – वाडा मार्गे भीमाशंकर येथे १०.३० वाजता पोहचून तिचा परतीचा प्रवास दुपारी ११ वाजताचा असल्याची माहिती आगार प्रमुख एन.बी भिसे यांनी सांगितले आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर खेड तालुक्याचे पश्चिम भागतील गांवमधील लोकांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे येथे जाण्यासाठी लोकाना खुप त्रास घ्यावा लागत होता.
    शिवाजी नगर पुणे येथून खेड – वाडा मार्गे भीमाशंकर ही एस.टी बस वाडा येथे आल्यानंतर वाडा येथील सरपंच रघुनाथ लांडगे, गोरक्षनाथ मोरे, अक्षय केदारी, दत्तात्रय मोरे, श्रीपती कहाने, राजू कौदारे, वासुदेव रावळ यांनी गाडीचे पूजन करुन गाडीचे चालक आर.बी दहिंजे, वाहक पी.बी. मोरे यांना सन्मानित केले ग्रामस्थानी त्यांचे आभार मानले.