अतिवृष्टीसंदर्भात आढावा बैठकीत गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांच्या प्रशासनाला सुचना.

अतिवृष्टीसंदर्भात आढावा बैठकीत गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांच्या प्रशासनाला सुचना.

निवृत्ती नाईकरे पाटील.
मु.पो.ग्रामीण.

पुणे जिल्ह्यात २२ ते २४ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात आढावा बैठक पुणे येथे राज्याचे गृहमंञी दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षततेखाली घेण्यात आली.
दरडप्रवण क्षेत्राचा अभ्यास व कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याचे निर्देश वळसे पाटील यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, खरडून गेलेल्या जमिनी, फुटलेले बांध यांचे पंचनामे करून जमिनी पूर्ववत करण्यासाठी पकडई योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात यावी, परिसरात मनरेगा योजनेची कामे सुरू करावीत अशा सूचना वळसे पाटील यांनी केल्या.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव, जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुषप्रसाद, आयुक्त पुणे व पिंपरी चिंचवड मनपा, कृषी अधीक्षक, पुणे आदी अधिकारी उपस्थित होते.