अभिनेत्री ईला भाटे यांची रामभाऊ म्हाळगी विद्यालयास सदिच्छा भेट

अभिनेत्री ईला भाटे यांची रामभाऊ म्हाळगी विद्यालयास सदिच्छा भेट

संदिप मेदगे प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

दि १ सप्टे 2021 रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे यांनी विद्यालयात विकासात्मक केलेली कामे पाहण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे यांनी विद्यालयात केलेल्या चांगल्या कामाची पाहणी केली सन १९ या वर्षात १७ लाख रुपयाची कामे विद्यालयात केली त्यामध्ये सुसज्य बेंचेस , अदयावत प्रयोगशाळा , ग्रंथालय , व शेड अशी कामे केली. कामे दर्जेदार झाली म्हणुन प्रसंशा केली. जेष्ठ सिनेअभिनेत्री इला भाटे ( राधा ही बावरी फेम) यांनी विद्यालयास भेट देऊन शिक्षकांशी सवांद साधला व शाळेच्या समस्या जाणून घेऊन शाळेसाठी सुसज्ज अशी कॉम्पुटर लॅब देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या समवेत रोटरी क्लब चे अध्यक्ष अपर्णा क्षीरसागर मॅडम , श्रीयुत दाते , शिरिष ब्रम्हे ,व त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशाबद्दल व कामाबद्दल कौतुक केले आहे . विद्यालयाला गुणवत्तेचे ISO मानांकनासाठी विद्यालयाची तयारी चालु आहे .
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील माजी विद्यार्थी कु कौस्तुभ लचके यांनी अभिनेत्री ईला भाटे यांचे स्केच भेट दिले . प्राचार्य श्री संजय शिंदे , पर्यवेक्षक अविनाश काळोखे , शिक्षण विकास मंडळ कडूसचे शाळा समिती अध्यक्ष श्री प्रकाश कालेकर , संचालक ज्ञानेश्वर ढमाले , योगेश धायबर , रामशेठ ढमाले या प्रसंगी सर्व शिक्षक वृद उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रामदास रेटवडे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री तानाजी कोळेकर सर व आभार श्री प्रविण काळे सर यांनी केले .