अभिमानास्पद काम! शहीद सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवणे हीच खरी देशसेवा.

अभिमानास्पद काम! शहीद सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवणे हीच खरी देशसेवा.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण!

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कुरकुंडी ता.खेड या गावचे सुपुत्र शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे यांचे नावाने कुरकुंडी या ठिकाणी सांस्कृतिक भवन जिल्हा परिषद सदस्य व गटनेते शरद बुट्टे पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण शहीद संभाजी राळे यांच्या मातोश्री अरुणाताई यांचे हस्ते आणि तालुक्यातील माजी सैनिक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी खेड तालुक्यातील देशसेवा केलेल्या माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते शरद बुट्टे पाटील,जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोलदादा पवार यासह स्थानिक ग्रामस्थ व भामा खोऱ्यातील सरपंच, उपसरपंच कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.