अवकाळी पावसामुळे शेती तोट्यातच पण जनावरांच्या मृत्युमुळे शेती पुरक व्यवसाय सुद्धा तोट्यात!शेतकर्‍यांनी जगायच कस?

अवकाळी पावसामुळे शेती तोट्यातच पण जनावरांच्या मृत्युमुळे शेती पुरक व्यवसाय सुद्धा तोट्यात!शेतकर्‍यांनी जगायच कस?

 

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यात ७४७ पेक्षा जासृत शेळ्या, मेढ्यां व गायींचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने अवकाळी पाऊस झाला यामुळे जुन्नर तालुक्यात अनेक मेंढ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात ७४७ पेक्षा जास्त मेंढ्या, शेळ्या व गायींचा मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती जुन्नर चे नायब तहसीलदार सचिन मुंडे यांनी दिली आहे. या घटनांचे अनेक ठिकाणी पंचनामे करण्याचे काम अजून सुरू असून यामध्ये मेंढ्यांच्या मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
यामध्ये आळेफाटा परीसरातील राजुरी ,आळे,वडगाव आनंद,वडगाव कांदळी,बोरी बुद्रुक,बेल्हे, गुळुंचवाडी,शिरोली,निमगाव सावा या गावात चरायला आलेल्या मेंढपाळांच्या २५० पेक्षा जास्त मेंढया तसेच ३ गाया मुत्यूमुखी पडल्या आहेत. यामध्ये राजुरी ४५, ओतुर ८७, गोळेगाव ५६, आळे ५६ , वडगाव आनंद येथील १३० मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
संबधित मृत्यूमुखी पडलेल्या मेढयांचा तसेच मुत्यूमुखी पडलेल्या तीन गाईंचे पंचनामे तलाठी तसेच पशुवैद्यकिय अधिकारी यांनी जागेवर जाऊन केले आहेत. तरी अजून काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान अवकाळी पावसामुळे मका ,कांदा ,डाळींब ,ऊस तसेच द्राक्षे या पिंकाचे नुकसान झाले असून या पिकांची झालेल्या नुकसानीची भरपाई शेतक-यांना मिळावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.