पञकार अॅड.निलेश आंधळे व पञकार सदा अमराळे यांच खेड तालुक्यात मोठ काम!वाचा सवीस्तर बातमी!

पञकार अॅड.निलेश आंधळे व पञकार सदा अमराळे यांच खेड तालुक्यात मोठ काम!वाचा सवीस्तर बातमी!

टाटा मोटर्स मध्ये असलेले सदा अमराळे व खेड तालुक्यातील नामांकीत वकील अॅड निलेश आंधळे हे माझे २००७ पासूनचे मिञ!मी नुकताच लोकमतला ग्रामीण बातमीदार म्हणुन रूजू झालो होतो.त्यावेळेस सदा भाऊ सकाळचे बातमीदार होते व निलेश भाऊ यांच शिक्षण सुरू होते.या दोनही माणसांना तेव्हा पासूनच सामाजीक कार्याची आवड होती.सदा भाऊ पञकारीता व ट्रेकींगच्या माध्यमातून समाजकार्यात होते तर निलेश भाऊ बजरंग दलाच्या माध्यमातून सामाजीक क्षेञात होते.मागील वर्षी कोरोना कालावधीत दोघांनी पण खुप मोठ सामाजीक योगदान दिल.यावर्षी सदा भाऊंनी पाच वेळा प्लाझ्मा दान करून तालुक्यात एक आदर्श दाखवला.यातूनच निलेश भाऊ व सदा भाऊ यांनी ठरवल की प्लाझ्मा दानाची एक चळवळ उभी करायची आणी म्हणता म्हणता खेड तालुक्यात व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एक मोठी चळवळ उभी राहीली असून,यातूनच प्लाझ्मा बरोबरच आॅक्सीजन बेड,व्हेटींलेटर बेड,औषधे याची पुर्तता सुरू झाली आहे.या ग्रुपच्या माध्यमातून काम करणार्‍या अमर टाटीया,निलेश संभूस,कैलास दुधाळे व सर्व मिञ परिवार व प्लाझ्मा दान करणार्‍या देवदुतांना सर्वांना यातून मोठ यश मिळो व कोरोना हद्दपार होवो याच हनुमान जन्मोस्तवाच्या खुप खुप शुभेच्छा!जय बजरंग बली!