आई-वडिलांच्या स्मरणार्थ कमान ता.खेड स्माशानभुमी परिसर सुशोभिकरणासाठी ५१ हजार रूपयाची देणगी सुपुर्त!

आई-वडिलांच्या स्मरणार्थ कमान ता.खेड स्माशानभुमी परिसर सुशोभिकरणासाठी ५१ हजार रूपयाची देणगी सुपुर्त!

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

अखंड सौभाग्यवती लक्ष्मीबाई बाजीराव नाईकरे(वय ८५) व स्वर्गीय श्री बाजीराव शंकर नाईकरे पाटील (वय ९१)यांच्या स्मरणार्थ त्यांची मुले श्री दिलीप बाजीराव नाईकरे,श्री विलास बाजीराव नाईकरे,कृष्णराव नाईकरे,श्री ज्ञानेश्वर बाजीराव नाईकरे यांनी कमान येथील स्मशानभुमी परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी रविवार दि.१२ रोजी ५१ हजार रूपयाची देणगी कमानचे सरपंच योगेश नाईकरे यांच्याकडे सुपुर्त केली.
यावेळी मा.तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशराव नाईकरे,भानुदास नाईकरे,सोपानराव नाईकरे व हरिशेठ नाईकरे,माजी सैनिक सुरेशराव नाईकरे,अशोकराव नाईकरे,हेमंत नाईकरे हे ग्रामस्थ उपस्थित होते.देणगीदारांचे ग्रामस्थांच्या वतीने हार्दीक आभार मानण्यात आले.