आखरवाडी ता.खेड येथे अतीवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे सुरू!

आखरवाडी ता.खेड येथे अतीवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे सुरू!

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

आखरवाडी गावांमध्ये बांधावरती जाऊन नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू झाले आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले यावेळी यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष श्री अरुण गोकुळ मुळूक, सरपंच मोनिकाताई, मुळूक उपसरपंच विठ्ठलराव, ग्रामपंचायत सदस्य नीलम ताई मुळूक, माजी उपसरपंच गोविंदराव मुळूक, ग्रामसेवक शरद शिरसाट,शेतकरी समीर मुळूक, अमर मुळूक, अशोक मुळूक, विलास मुळूक, सोपान मुळूक, सावळेराम मुळूक, भिकाजी मुळूक, लक्ष्मण मुळूक, सुरेशशेठ मुळूक, अशोक दत्तात्रय मुळूक, तुकाराम मुळूक इत्यादी शेतकरी उपस्थित होते. ग्रामसेवक शरद शिरसाठ यांनी पंचनामे केले.।