आखरवाडी ता.खेड येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांची भुमीपुजन व उदघाटन सपंन्न.

आखरवाडी ता.खेड येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांची भुमीपुजन व उदघाटन सपंन्न.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

आमदार दिलीपराव मोहिते यांच्या विशेष प्रयत्नातून आखरवाडी गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ निर्मलाताई पानसरे यांच्या विशेष फंडातून 35 लाख रुपये निधी ची विकास कामे व  पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य अंकुश राक्षे यांच्या निधीतून 8 लाख रुपयांच्या विकास कामांचे  भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहितेपाटील, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यक्षम अध्यक्षा सौ निर्मलाताई सुखदेवतात्या पानसरे, पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती अरुण शेठ चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक शेठ घुमटकर, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण शेठ चांभारे, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ शेठ होले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव कातोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव लिंबोरे पाटील, राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष अॅड अरुण मुळूक, राजगुरुनगर शहराध्यक्ष सुभाषशेठ होले,  राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वैभव नाईकरे पाटील, उद्योजक प्रताप शेठ ढमाले, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दिनेश कड, कडधे गावचे उपसरपंच केतन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत शेंडे सर, आखरवाडी गावच्या आदर्श सरपंच मोनिकाताई मुळूक, उपसरपंच विठ्ठलराव मुळूक, ग्रामपंचायत सदस्य नीलमताई मुळूक, अविनाश मुळूक, दिपाली मुळूक, शितल मुळूक, दत्तात्रय मुळूक, माजी सरपंच रितेश मुळूक, बबन मुळूक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस गणपतराव मुळूक, माजी चेअरमन विठ्ठलराव मुळूक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विनायक शेठ मुळूक, पश्चिम विभागाच्या अध्यक्षा सुजाता ताई पचपिंड, सामाजिक कार्यकर्ते सुरेश मुळूक, युवा नेते दिगंबर मुळूक, दावडी गावचे उपसरपंच संतोष शेठ गव्हाणे, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच विठ्ठल मुळूक यांनी केले. प्रास्ताविक ॲड मुळूक यांनी केले. आभार रितेश मुळूक यांनी मानले. यावेळी आमदार दिलीपराव मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पंचायत समितीचे सभापती अरुण शेठ चौधरी, माजी सभापती अंकुश राक्षे आदींची भाषणे झाली.