आखरवाडी ता.खेड गायरानातील वृक्ष जगवण्यासाठी शेत तळ्याचे भुमिपुजन

आखरवाडी ता.खेड येथे गायरानातील वृक्ष जगवण्यासाठी शेत तळ्याचे भुमिपुजन

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

आखरवाडी ता.खेड येथे गायरान क्षेत्रात शेत तळ्याचे पूजन करण्यात आले.

फोर्टीन ट्रीज संस्थेमार्फत आखरवाडी ग्रामपंचायत गावच्या गायरान मध्ये 3500 झाडांची लागवड करण्यात येत आहे. झाडांना पाण्यासाठी फोर्टीन ट्रीज संस्थेमार्फत पाण्याचे तळे घेण्याचा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी सरपंच सौ मोनिकाताई मुळूक, खेड तालुका राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अरुणशेठ मुळूक, विद्यमान सदस्य दत्ताभाऊ मुळूक, उद्योजक अमरशेठ मुळूक, सचिन वाडेकर, दिगंबर मुळूक, तायडे साहेब, स्वप्निल मुळूक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते