आखरवाडी येथील गेली अनेक वर्षापासूनचा कालवा गळतीचा प्रश्न सुटणार!आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली दखल!

आखरवाडी येथील गेली अनेक वर्षापासूनचा कालवा गळतीचा प्रश्न सुटणार!आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली दखल!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

आखरवाडी (ता.खेड) परिसरातुन जाणाऱ्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या अस्तरीकरण कालवा दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ खेड तालुका राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अरुण मुळूक व सरपंच मोनिका मुळूक यांच्या हस्ते करण्यात आला.

आखरवाडी परिसरातून चासकमान धरणाचा डावा कालवा जात आहे. परिसरातुन जाणाऱ्या कालव्याची
गेली अनेक वर्षां पासून दुरअवस्था झाली होती. यामुळे कालव्यातुन मोठ्या प्रमाणात पाणी गळती निर्माण झाली होती.
यामुळे कालव्या अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांची शेती नापिक झाली होती तसेच अनेक नागरिकांच्या घरांच्या भितीना ओली येऊन सतत ओलसर असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
आखरवाडी गावठाण परिसरात होणारी पाणी गळती थांबिण्याची मागणी नागरिकांन बरोबरच शेतकऱ्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन मंजूरी देत कामाला सुरूवात केली.
अनेक वर्षे प्रलंबित असलेला कालवा गळतीचा प्रश्न सुटनार असून कालवा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त करत आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे परिसरातुन कौतुक केले जात आहे..
यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी लीगल सेल अध्यक्ष अरुण मुळूक, सरपंच मोनिका मुळूक, उपसरपंच विठ्ठल मुळूक, सदस्य नीलम मुळूक, सुंदर मुळूक, गणपत मुळूक, राघू मुळूक, जालिंदर मुळूक, नथू मुळूक, एकनाथ मुळूक, यशवंत मुळूक, सहादू मुळूक, कुंडलिक मुळूक, मनोहर मुळूक, लक्ष्मण कोंढवळे, भास्कर मुळूक, भगवान मुळूक, प्रल्हाद मुळूक, संदीप मुळूक, दगडू मुळूक, निवृत्ती मुळूक, विलास मुळूक, आरूष मुळूक, अमर मुळूक, प्रमोद मुळूक आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.