आखरवाडी येथे मंगळवार दि.२ रोजी बिबट्याचा भरदिवसा मनुष्यावर हल्ला 

आखरवाडी येथे मंगळवार दि.२ रोजी बिबट्याचा भरदिवसा मनुष्यावर हल्ला

आखरवाडी ता खेड येथे भरदिवसा बिबट्याने हल्ला करून साहेबराव खांडगे या माणसाला जखमी करून पसार झाला, घडलेल्या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
येथील शिवेचा ओढा परिसरात साहेबराव बबन खांडगे, सोमनाथ शंकर मुळूक, चंद्रकांत प्रभाकर मुळूक व ओंकार सोमनाथ मुळूक हे शेतातील ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकल्याने चिखलामध्ये दगड टाकून अडकलेला ट्रॅक्टर बाहेर काढत असतान शेजारी असलेल्या काटेरी झुडपातून वेगाने बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्याने सगळ्यांमध्य घबराट झाली तेवढयात बिबट्याने साहेबराव खांडगे यांच्यावर हल्ला करून पंजा मारल्याने खांडगे यांच्या पंजा पोटरीवर बसल्याने जखमी झाले व तेवढ्यात बाकीच्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारच्या झाडीत पसार झाला. घटनेची माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. कासारे, वनपाल आर. ए. गोकूळे, वनरक्षक ए. बी. नाईकवाडे, एस. आर. राठोड, पी. पी. शिंदे, वनसेवक आर. डी. सातकर, एन.एम. चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून जखमी खांडगे यांना चाकण येथील रूग्णालयात पाठवले. घटनास्थळी पाहणी केली असता झुडपे व अन्य झाडामुले बिबट्याचा मागोवा काढता आला नाही ,रात्रीच्या वेळी बॅटरी तसेच काठी हातात असुद्या, गटाने काम करा, वाकुन अथवा बसून शेतात काम करताना सावध रहा अश्या सुचना येथील नागरिकांना पी. एस. कासारे यांनी दिल्या. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
————————-