आदिवासी युवा मंच नायफड तर्फे नायफड गावामध्ये COVID-19 लसीकरण कॅम्प आयोजित.

आदिवासी युवा मंच नायफड तर्फे नायफड गावामध्ये COVID-19 लसीकरण कॅम्प आयोजित.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

दिनांक 25 जून रोजी खेड तालुक्यातील नायफड गावामध्ये कोविड 19 चे लसीकरण करण्यात आले. कोरोनाचे लस प्राथमिक आरोग्य केंद्र डेहणे येथे उपलब्ध होत होती परंतु नायफड ग्रामस्थांना नायफड पासून डेहणे हे पाच किलोमीटर अंतर पार करून लस घेण्यासाठी जावे लागत होते. आणि लस घेऊन पुन्हा माघारी येतावेळेस रस्त्यावर चक्कर येऊन पडणे, पावसात भिजून आजारी पडणे असे प्रकार घडत असून या गोष्टीचा परिणाम नायफड गावातील जनतेच्या आरोग्यावर होत होते. ही गोस्ट नायफड मधील आदिवासी युवा मंचच्या कार्यकर्त्यांच्या लक्ष्यात आली व त्यांनी नायफडमध्ये लसीकरण कॅम्प घ्यायचे ठरवले. व डेहण्याचे डॉक्टर पंडित यांच्याशी संपर्क करून दिनांक 25 जून रोजी नायफड मध्ये कॅम्प आयोजित करून 80% लोकांचे लसीकरण करून घेतले.
या कार्यासाठी आदिवासी युवा मंचाचे निलेश तिटकारे, विकास भाईक, सुदर्शन तिटकारे,शरद ठोकळ, भगवान काठे,गणेश तिटकारे,श्याम मिलखे,रोहित ठोकळ, राहुल तिटकारे, दत्ता तिटकारे सह अनेक कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सुनिल मिलखे व रोहिदास भाईक यांनी आपली उपस्थिती उपस्थिती दाखवून हे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी लाख मोलाचे सहकार्य केले.
सर्वात शेवटी रोहिदास भाईक यांनी डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.