आनंदाचा शिधा’ योजनेअंतर्गत कमान ता.खेड येथे दिवाळी किटचे वाटप

आनंदाचा शिधा’ योजनेअंतर्गत कमान ता.खेड येथे दिवाळी किटचे वाटप

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून दिवाळी किट (आनंदाचा शिधा) चे वाटप स्वस्त धान्य दुकानांमधून सुरु करण्यात आले आहे. सदरील किट फक्त 100 रुपयांत भेटणार असून त्यामध्ये साखर, रवा, चणाडाळ प्रत्येकी एक किलो व एक लिटर तेल मिळणार आहे.

आनंदाचा शिधा’ योजनेअंतर्गत कमान ता.खेड येथे दिवाळी किटचे वाटप करण्यास सुरवात करण्यात आली असुन जि.प.सदस्य अतुल देशमुख व सरपंच योगेश नाईकरे यांच्या हस्ते दिवाळी किट वाटपास सुरवात करण्यात सुरवात झाली.

यावेळी भाजपा नेते जि.प.सदस्य अतुल देशमुख, विद्यमान सरपंच योगेश नाईकरे, माजी सरपंच अशोक नाईकरे, विद्यमान विविध कार्यकारी सो.संचालक नामदेव जाधव,
आदर्श शिक्षक मा पंडितराव नाईकरे, बाजीराव नाईकरे, श्री किसनराव नाईकरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वस्त धान्य दुकानदार श्री संदिपदादा शेटे यांनी उपस्थित ग्राहक यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.सर्व शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर आपले दिवाळी किट घेवून जावे असे अहवान संदिप शेटे यांनी केले आहे.