आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांना मंञीपद तरी दया अथवा जिल्हा बँकेत अध्यक्ष तरी बनवा!

आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांना मंञीपद तरी दया अथवा जिल्हा बँकेत अध्यक्ष तरी बनवा!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांना मंञीपद तरी दया अथवा जिल्हा बँकेत अध्यक्ष तरी बनवा अशी आग्रही मागणी खेड तालुक्यातील सर्व सामान्य जनतेमधून होतआहे.गेली अनेक वर्षापासून खेड तालुक्यातील जनता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे.

खेड तालुक्यामध्ये आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या कार्यकालामध्ये तालुक्यातील अनेक महत्वाचे विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत.

खेड तालुक्यातील दळणवळण,शैक्षणिक,कृषी,सहकार,जिल्हा न्यायालय,औदयोगिक या सर्वच क्षेञात उलेखनिय कामे मार्गी लावण्याचे काम खर्‍या अर्थाने आमदार मोहिते पाटील यांच्या कार्यकाळात झाले आहेत.

आमदार मोहिते पाटील यांनी केलेल्या तालुक्यातील कार्यामुळे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे तालुक्यातील स्थान बळकट झाले असून,स्पष्टवक्तेपणा,विधानसभेतील अभ्यासपुर्ण भाषणे,यामुळे खेड तालुक्यातील जनतेच्या मनात आदरयुक्त स्थान निर्माण करणारे लोकप्रिय प्रतिनिधी म्हणुन आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचा उल्लेख आवर्जून केला जातोय!

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व राज्याचे उपमुख्यमंञी अजीतदादा पवार साहेब यांनी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेत अध्यक्षपदाची संधी दयावी अशी मागणी खेड तालुक्यातील जनतेमधून होत आहे.