आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचा सत्कार व श्री म्हातोबा पतसंस्था यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन!

आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचा सत्कार व श्री म्हातोबा पतसंस्था यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीपराव मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आखरवाडी ग्रामपंचायत, बहिरवाडी ग्रामपंचायत, राष्ट्रवादी लिगल सेल खेड तालुका यांच्या वतीने सत्कार व श्री म्हातोबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते-पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल, ग्रामपंचायत आखरवाडी, ग्रामपंचायत बहिरवाडी व म्हातोबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आमदार आदरणीय दिलीप मोहिते-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री म्हातोबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार दिलीपराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड अरुण मुळूक, पतसंस्थेचे अध्यक्ष व बहिरवाडी चे सरपंच जगन्नाथ राक्षे, आखरवाडीच्या सरपंच सौ मोनिकाताई मुळूक, उपसरपंच विठ्ठलराव मुळूक, ग्रामपंचायत सदस्य नीलमताई मुळूक, अॅड मनीषा टाकळकर, अॅड अतुल गोरडे, अॅड बिभीषण पडवळ, अॅड शंकरराव कोबल, ॲड संदीप गाडे, उद्योजक रोहिदासशेठ मांजरे, युवा कार्यकर्ते समीर भाऊ मुळूक, दिगंबर मुळूक, अशोकराव मुळूक, अमर मुळूक, रोहनभैया मोहिते पाटील इत्यादी उपस्थित होते.