आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.प्रशासनाला सुचना.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.प्रशासनाला सुचना.
निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

 अतिवृष्टीमुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक मोठे नुकसान झाले आहे.गुरुवारी २२/७ रोजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा नियोजित मुंबई दौरा असल्यामुळे आज शनिवारी २४/७ रोजी आमदार दिलीप मोहिते पाटील  यांनी नुकसान पाहणी दौरा केला. मंदोशी(जावळेवाडी) येथील पुल अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाहून गेला आहे.अनेक ठिकाणी भात शेतीचे सुद्धा नुकसान झाले असून मुक्या जनावरांचे सुद्धा खूप हाल झाले आहेत.या प्रसंगी आमदार मोहिते यांनी प्रशासनाला शेती तसेच झालेल्या इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून त्वरित मदतकार्य सुरू होईल.
या दौऱ्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मा.अरुणशेठ चांभारे(मा.जि.प.सदस्य),मा.विठ्ठलशेठ वनघरे (म.उप सभापती कृ.उ.बा.समितीखेड)मा.दत्ताशेठ खाडे (सरपंच,डेहणे),मा.लक्ष्मणशेठ तिटकारे (कात्रज दुध सं.संचालक ) मा. शंकरशेठ कोरडे ( उप सरपंच डेहणे) मा.दत्ताशेठ पाटेकर व मा.शामराव वाळूंज(तालुका देखरेख संघ खेड )मा.सौ.शितलताई आंबेकर ( सरपंच, मंदोशी) हे उपस्थित होते.