आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याहस्ते चासकमान धरणाचे जलपुजन

  1. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याहस्ते चासकमान धरणाचे जलपुजन

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

चासकमान धरण यंदा महिनाभर अगोदरच भरले.४ आॅगस्ट रोजी चासकमान धरण १००% भरले होते.यामुळे धरणाच्या पाच दरवाज्याद्वारे भीमानदीपाञात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता.
रविवार दि.८ रोजी सकाळी ११ वाजता खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते चासकमान जलाशयात साडीचोळी व नारळ अर्पण करून जलपुजन करण्यात आले.त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर,माजी कृषी सभापती अरूण चांभारे,राष्ट्रवादी लिगल सेलचे तालुका अध्यक्ष अरूण मुळुक,पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे,शहर अध्यक्ष सुभाष होले,राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे पश्चिम विभाग अध्यक्ष विनायकराव मुळुक,आखरवाडीच्या सरपंच मोनिका मुळुक,उपसरपंच विठ्ठलराव मुळुक उपसरपंच केतन चव्हाण,वाडा गावचे माजी सरपंच जाकीरशेठ तांबोळी व पक्षाचे पदाधिकारी व चासकमान धरणाचे अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.