आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा एक फोन आणी १००के.व्ही ऐवजी २०० के.व्ही ट्रान्सफाॅर्मर बसविला.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा एक फोन आणी १००के.व्ही ऐवजी २०० के.व्ही ट्रान्सफाॅर्मर बसविला.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

आज दि.11 रोजी चास पापळवाडी रोड येथील सुमारे दीड महिन्यापासून जळलेला 100 के. व्ही.चा ट्रान्सफॉर्मर खूप वेळा पाठपुरावा करून देखील मिळत नव्हता त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे खूप हाल होत होते अनेक शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देखील मिळत नव्हते ज्यांनी बिल भरले आहेत त्यांचे देखील कनेक्शन बंद झाले होते ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड असल्यामुळे शेती पंपाच्या मोटारी चालत नव्हत्या शेतकऱ्यांनी शेवटी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्याकडे दाद मागितली आमदार साहेबांनी शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन 100 के. व्ही. च्या ऐवजी नवीन 200 के.व्ही.दोन दिवसांत बसविण्यास सांगितले आणि तो आज बसविण्यात आला जेणे करून भविष्यात तेथील शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही.यावेळी उद्योजक प्रतापदादा ढमाले पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती चे सदस्य रविंद्र गायकवाड यांनी पाठपुरावा करून नागरिकांची गैर सोय दूर केली,दलित स्वयं सेवक संघ,महाराष्ट्र राज्य,महिला अध्यक्षअलकाताई जोगदंड वैभव ढमाले कानिफ अरगडे चास शाखा सहाय्यकअभियंता सौ पाटील मॅडम आणि महावितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.सर्वांनी आमदार मोहिते पाटलांचे आभार मानले