आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना विकासकामांविषयी सुचना.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना विकासकामांविषयी सुचना.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

चाकण ता.खेड येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग खेड व बांधकाम विभाग पंचायत समिती या दोन्ही विभागाची बैठक घेण्यात आली त्यामध्ये आज पर्यन्त चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला काही कामात अडचणी असतील तर त्याही गोष्टींचा आढावा घेण्यात आला पुढे करावयाची प्रस्तावित कामे कामे,तसेच तालुक्यातील गावचे गावनिहाय शाळा इमारत,रस्ते,पूल,साकव पूल,ग्राम पंचायत इमारत, अंतर्गत रस्ते ,गावांना जोडणारे रस्ते ,स्मशान भूमी सुशोभीकरण,आरोग्या च्या दृष्टीने दवाखाने व आरोग्यासाठी सोई सुविधा, छोटे बंधारे,अश्या प्रकारे गावचे नियोजन करावे त्यानुसार जिथे या योजना मधून काम केले नाही अश्या गावात काम करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री भिंगारदेवें, श्री दराडे,श्री जाधव ,श्री पवार व पंचायत समिती बांधकाम विभागाचे श्री कांनडे,श्री भिंगारे, श्री शिंदे ,श्री जांभूकर, श्री जोशी असे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते