आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांचा ट्रायबल फोरम च्या वतीने सत्कार.

आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांचा ट्रायबल फोरम च्या वतीने सत्कार.

दशरथ खाडे,भंडारदरा
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या आयुक्त पदी डॉ राजेंद्र भारूड यांची नियुक्ती झाल्याबद्दल ट्रायबल फोरमचे राज्य कार्याध्यक्ष डी बी घोडे, सह्यादी आदिवासी विकास प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कृष्णा भालचिम, जेष्ठ नागरिक संघाचे विष्णू शेळके, सुदाम मराडे, भागूजी अंभेरे यांनी सत्कार केला.
त्यावेळी आदिवासी समाजात होणारी घुसखोरी ला आळा घालणे आवश्यक आहे. तसेच बोगस आदिवासी नी नोकरी मध्ये घेतलेला लाभ हा शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजे. डाँ. राजेंद्र भारूड हे नंदूरबार जिल्हाधिकारी या पदावरून पुणे या ठिकाणी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल आदिवासी समाजाला मोठ्या आनंद झाला आहे. ज्या प्रकारे बोगस आदिवासी नी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून त्याला पायबंद घालण्यासाठी डाँ राजेंद्र भारूड यांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यांच्या मागे आदिवासी समाजाची मोठी ताकद उभी करू
अशी भूमिका डी. बी. घोडे यांनी माडली आहे.
तसेच आदिवासी समाजाबदल अनेक महत्वाच्या गोष्टीवर चर्चा झाली. अशी माहिती सुदाम मराडे यांनी दिली.