ई पिक पाहणी मोबाईल अॅपचा सर्व शेतकर्‍यांनी उपयोग करावा- पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव.

ई पिक पाहणी मोबाईल अॅपचा सर्व शेतकर्‍यांनी उपयोग करावा- पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

ई पीक पाहणी मुळे जिल्हातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे.सर्व शेतकरी बांधवानी मोबाईल वर अॅप डाऊनलोड करून ई पीक नोंदनी करावी असे अहवान पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वेताळे ता.खेड येथे केले.
त्यांच्या समवेत जिल्हाअधिकारी राजेश देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,उपजिल्हा अधिकारी संजय तेली,खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण,तहसीलदार वैशाली वाघमारे यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.