उदयोजक व सामाजीक कार्यकर्ते श्री प्रताप ढमाले यांची नागरिकांसाठी महत्वाची सुचना!

उदयोजक व सामाजीक कार्यकर्ते श्री प्रताप ढमाले यांची नागरिकांसाठी महत्वाची सुचना!

आपल्या भागातील सर्व नागरिकांना विनंती*
🙏🙏🙏
मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आहे.
पण ग्रामीण भागात मला त्याची उणीव भासत आहे.
तहसीलदार, तालुका आरोग्यधिकारी,आमदार,जिल्हा परिषद सदस्य अशा सर्वांच्या मी संपर्कात आहे.सर्वजण हतबल झाले आहेत.
तालुक्यातील परिस्थिती खूप भयंकर आहे.
ऑक्सिजन ची कमी,व्हेंटिलेटर उपलब्ध नाही,बेड नाहीत,इंजेक्शन चा तुटवडा ह्या मुळे परिस्थिती हाताबाहेर आहे.
●कोरोनाची दुसरी लाट ही पहील्या लाटेपेक्षा 3 पट भयंकर आहे.
●बरे होऊन 15 दिवस कुटुंबातील सदस्यांना विलगिकरणात ठेऊन देखील नवीन सदस्यांना बाधा होत आहे.
●कृपया काळजी घ्या
●माझ्या निदर्शनास आलेल्या गोष्टी-
१.अल्पवयीन मुलांचा रस्त्याने सायकल ,गाड्या घेऊन जाताना,दुकानात जाताना वावर वाढला आहे.कृपया तो टाळावा.
२.सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळावे.
३.नदीला धुणे,पोहायला जाणे टाळावे.
४.किराणा दुकांनांनी शासनाने घालून दिलेल्या वेळेतच दुकाने उघडावीत.अनोळखी व्यक्तींना प्रवेश टाळावा.
५.ग्रामपंचायत ने दवंडी पेटऊन जनजागृती करावी ही विनंती.
६.शेजाऱ्यांच्या इथे जाणे कटाक्षाने टाळावे.
७.रस्त्याला वावर कमी करावा.
कारण MIDC ला जाणारे कामगार रस्त्याने मोठ्या प्रमाणात जात आहेत.
८.जितकी काळजी घेता येईल तितकी घ्यावी.
९.कोरोना होऊन बरे झालेल्यांना पुन्हा कोरोना होतो.हे लक्षात असू द्या.
७.लस घेताना गर्दी टाळावी.
८.लस घेतल्यानंतर ८ दिवस तरी आरामाची अत्यंत आवश्यकता आहे.
९.लस घेतली म्हणून बिनधास्त होऊ नका.लस प्रतिकारशक्ती वाढवते. कोरोना पुन्हा होणार नाही असे नाही.
१०.लस घेतल्यानंतर इतर औषधे, इंजेक्शन टाळावे.आपल्या डॉक्टरांना लक्षात आणून द्यावे.
११.कोरोना झालेल्यांनी मानसिक स्थिती खचून देऊ नका.बरे होण्याचे प्रमाण खूप आहे.
१२.जरा देखील लक्षणं जाणवली तर अंगावर काढू नका.प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधा.
१३.आरोग्य अधिकारी,आणि आप्तेष्टांचा संपर्क मोबाईल मध्ये असू द्या.
१४.Emergency वरील उपाय घेण्याची काळजी काय करावे लागेल.त्याचा विचार आत्ताच करून ठेवा.
काही अडचण आली तर कळवा.
9403350000
वरील सर्व माझे वैयक्तिक मत आहे.

प्रताप ढमाले
9403350000
*Stay Home.*
*Stay Safe.*
*Stay Happy.*