एकलहरे बांगरवाडी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट

एकलहरे बांगरवाडी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

एकलहरे बांगरवाडी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली.त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे उपस्थित होते.
बांगरवाडी येथे डोंगरवार जमीनीला २०० ते २५० फुट भेग पडल्यामुळे जमीन ढासळण्याची शक्यता निर्माण झाली असून,महसुल विभागाने दोन दिवसापुर्वीच स्थळ पहाणी करून येथील तीन कुटुंबाना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना दिल्या होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्यक्ष भेट दिली.त्यांच्या समवेत खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी व ग्रामस्थ उपस्थित होते.