एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत कडूस ता.खेड येथील नेहरेशिवार येथे कार्यक्रम

एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत कडूस ता.खेड येथील नेहरेशिवार येथे कार्यक्रम

कडूस प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

एकात्मिक बाल विकास योजना खेड तालुका अंतर्गत, कातकरी समाजासाठी गरोदर माता ओटी भरण, अन्नप्राशन दिन, सुपोषण दिन ,आज कडूस मधील नेहरे शिवार येथे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन कडूस मधील अंगणवाडी सेविका श्रीमती साधनाताई ढमाले व त्याच्या सहकारी यांनी केले. यावेळी स्थनिक महिला भगिनी, सौ लता ढमाले ग्रामपंचायत सदस्य, कांचनताई ढमाले पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपाध्यक्ष एकात्मिक विकास समन्वय समिती खेड तालुका या उपस्थित होते.