एकोनपन्नास वर्षापुर्वीची याञा व बैलगाडा शर्यतींचा इनाम.

एकोनपन्नास वर्षापुर्वीची याञा व बैलगाडा शर्यतींचा इनाम.
मु.पो.ग्रामीण प्रतिनीधी-निवृत्ती नाईकरे
मिञांनो ४९ वर्षापुर्वीच्या ग्रामिण भागातील याञांच स्वरूप कस होत याचा पुरावा म्हणजे त्याकाळातील याञेचे छापील पञक मिळाल आहे.जुन ते सोन या युक्ती प्रमाणे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्श गाव कान्हेवाडी बु.या गावची वेताळ देवाची याञा!चैञ शुद्ध १७/३/१९७२.बैलगाडा शर्यती पुर्वीपासूनच चालत आलेल्या आहेत.त्यावेळेस बैलगाडा शर्यतीचे इनाम सुद्धा कमी असायचे पण त्याबरोबर दिलेल्या ढाली बैलगाडा मालक मोठ्या अभिमानाने आपल्या घरात दर्शनी बाजूस लावत होते.कान्हेवाडी येथील या याञेत पहिल्या क्रमांकाच्या गाड्याचे बक्षीस ५१ रूपये,दुसर्‍यास २५ रूपये व तिसर्‍यास १५ रूपये होते.त्यावेळेस बैलगाडे हे पायी चालत जात असत.बैलगाड्याचे स्वरूप म्हटले तर आताच्या गाड्यापेक्षा तेव्हाच्या बैलगाड्याच वजन पाच पटीने जास्तच होते.शेतकर्‍यांच्या या मर्दानी खेळाला ग्रहण लागले व बैलगाडा शर्यती कायदयाच्या कचाट्यात बंद पडल्या.त्याकाळी गावागावात तमाशा व भारूड नसायची तर गावातीलच लोक कलाकार एकञ येवून नाटक बसवायची.नाटकातील पाञ ही गावातीलच नागरिक असायचे.महिनाभर अगोदरच रंगीत तालीम सूरू व्हायच्या.याञेच्या दिवशी पंचक्रोशीतील लोकांसमोर आपली कला सादर करून दाद मिळवायचे.पण म्हणतात ना जुन्या आठवणींना उजाळा याचा प्रत्यय कान्हेवाडी बु.गावच्या या जुन्या याञेच्या छापील पञकामुळे मिळाला.