एक क्षण हुतात्म्यांसाठी””नित्य अभिवादन/पूजा उपक्रम” वाचा बातमी सविस्तर

“एक क्षण हुतात्म्यांसाठी””नित्य अभिवादन/पूजा उपक्रम” वाचा बातमी सविस्तर

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

*हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव स्मृती शिल्प, राजगुरुनगर बस स्थानक(एसटी स्टँड)*

२०२१..२०२२ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत. हे वर्ष साजरे करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेकांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेऊन स्वातंत्र्य समरात बलिदान दिले.
याचे नित्य स्मरण व्हावे या हेतूने या वर्षात राजगुरुनगर शहरातील इच्छुक कुटुंबाने राजगुरुनगर बस स्थानक(एस. टी. स्टँड) येथील हुतात्मा राजगुरु , हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव स्मृती शिल्प येथे दैनिक नित्य अभिवादन/पूजा करण्याचे प्रयोजन आहे.
तरी शहरातील इच्छुक व्यक्ती, कुटुंबाने वर दिलेल्या लिंक वर आपले नाव आणि स्वेच्छेने वर्षभरातील कोणतीही अभिवादन/पूजा दिनांक टाकून नाव नोंदणी करावी.
स्वतः चा वाढदिवस, कुटुंबातील सदस्य वाढदिवस, लग्न वाढदिवस, घरातील व्यक्तीच्या स्मरणार्थ अथवा आवडीचा दिनांक टाकून नाव नोंदणी करता येईल.
“हुतात्मा राजगुरु यांची ११३ वी जयंती” दि.२४ ऑगस्ट २०२१ पासून दररोज सकाळी ८ ते १० वाजता नित्य अभिवादन/पूजा हा उपक्रम सुरू होणार आहे.

*”पूजा स्वरूप”* ..
१) मोठे हार ३
२) ऐच्छिक प्रसाद
३) परिवारासह पूजा

*”सम्पर्क”*
१)श्री. निलेश आंधळे ७५८८०७९००५
२)श्री. मधुकर गिलबिले गुरुजी ८६६९८६९८६५
३)श्री अमर टाटीया ९८८१४५२११३
४) श्री अजिंक्य बकरे ९७६६४१६०९२
५) श्री. नरेश हेडा ९८२२५२५२२२
६) श्री. योगेश पवार ९७६६४०४०३६
७) श्री. चेतन हाडके ९५०३९६७३९६
८) श्री. राकेश रूपडा ९८५०६५८१८१
९) श्री. राजेश लांडे ८१६९२००९७१
१०) मच्छिंद्र राक्षे ९०११२९०२९०