औदर ता.खेड येथे मुलाचा वृद्ध वडिलांवर चाकू हल्ला!

औदर ता.खेड येथे मुलाचा वृद्ध वडिलांवर चाकू हल्ला!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

फिर्यादी विठ्ठल कोंडाजी मेदगे वय ७० रहाणार औदर यांनी मुलगा संतोष विठ्ठल मेदगे वय ४५ याच्या विरोधात खेड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
दि.१६ रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्यादी घरी असताना मुलगा संतोषने पैश्याच्या कारणावरून वडिलांना शिविगाळ व मारहाण केली.चाकूने उजव्या हातावर वार करून जखमी केले व मोटारसायकलच्या चैनने मारहाण केली.अरोपीविरूद्ध खेड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून,खेड पोलीस तपास करत आहेत.