कङूस ग्रामपंचायतच्या वतिने ‘ग्राम स्वच्छता अभियान’

कङूस ग्रामपंचायतच्या वतिने ‘ग्राम स्वच्छता अभियान’

कङूस प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कङूस; जनमानसात स्वच्छतेचा संदेश रुजविणारे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त कङूस ग्रामपंचायतच्या वतिने ‘ग्राम स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. 
कङूस गावातील एसटी स्टँड, मुख्य रस्ते स्वच्छ करून स्वच्छ ठेवा, स्वच्छ ठेवा आपले गाव स्वच्छ ठेवा या जयघोषात परिसरात स्वच्छता केली.
यावेळी सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, भैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अभिनाथ शेंडे, उद्योजक प्रताप ढमाले, बाळासाहेब धायबर, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत धायबर, गणेश मंडलिक, बारकु गायकवाड, लता ढमाले, सुधाताई पानमंद, शहनाज तुरूक, विजया नाईक, बाळासाहेब बोंबले, दत्तात्रेय ढमाले, बबलू शेख, मारुती जाधव, रामदास मंडलिक, अशोक धायबर, नामदेव शेंडे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.