कडधे ता.खेड येथे ञिपुरारी पौर्णिमेला हजारो दिव्यांनी उजळले खंडोबा मंदिर

कडधे ता.खेड येथे ञिपुरारी पौर्णिमेला हजारो दिव्यांनी उजळले खंडोबा मंदिर

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कडधे ग्रामस्थांची श्री खंडोबा मंदिरा संदर्भात 29 ऑक्टोम्बर रोजी मिटिंग झाली.त्यात गावातील छोटे छोटे उत्सव साजरे करून गावात एकोपा आणि आनंद निर्माण करण्यासाठी ज्ञानेश्वर भाऊ गुरव गुरुजी यांनी कृती समिती स्थापन करण्याचा संकल्प सांगितला. त्याला सर्व गावाने पाठिंबा दिला.त्यानुसार त्रिपुरारी पौर्णिमेला दीप उत्सव केला.यात गावातील सर्व लहान-थोर,मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येकाने आपल्या यथाशक्ती प्रमाणे दिवे आणून कार्यक्रमात भाग घेतला.ऍड.अमृता गुरव यांनी 2200 दिवे मुंबईकर मंडळाने 1000 दिवे,केतन चव्हाण यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन केल्याप्रमाणे कोणी 100,250,500 याप्रमाणे 5750 दिवे जमा झाले,पैकी 5000 दिव्यां ना प्रज्वलित करून ग्रामस्थांनी खंडोबा मंदिर आणि परिसर उजळून टाकला.दिव्यांच्या या रोषणाईने मंदिर झगमगून गेले होते.या संपूर्ण कामात महिलांच योगदान मोठे होते.दिपप्रज्योलानंतर खंडेरायाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.देवळात झालेल्या चैतन्यमय वातावरणामुळे आपल्या कुटुंबासोबत सेल्फी,फोटोग्राफीची संधी ग्रामस्थांनी सोडली नाही.
या कामात ऍड अमृता गुरव,ज्ञानेश्वर भाऊ गुरव,दिनकर देवदरे,जिजाभाऊ नाईकडे,जनार्धन नाईकडे,केतन चव्हाण,प्रियांका देवदरे,अशोक सुतार,लक्ष्मण नाईकडे,कैलास नाईकडे,निलेश नाईकडे,रखमाजी धुमाळ,विकास मंडली.यांनी मोठे योगदान दिले.