कडूस ता.खेड जवळील कारामळी येथे विद्युत खांबाच्या शाॅर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग.दोन शेतकरी भावांचे मोठे नुकसान.

कडूस ता.खेड जवळील कारामळी येथे विद्युत खांबाच्या शाॅर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग.दोन शेतकरी भावांचे मोठे नुकसान.

आज दुपारी कडुस( कारामळी ) येथे लाईट खांबाच्या शॉर्टसर्किट मुळे अरुण धोंडिबा काळोखे, संजय धोंडिंबा काळोखे दोन्ही भावांच्या गाईंच्या गोठ्याला दुपारी आग लागली त्यामध्ये ७ दुग्धा गाया ३ वासरे होती २ गाया जागी मृत्यूमुखी पडल्या आणि उर्वरित गाया वासरे ८५ टक्के भाजल्या असून अतिशय दुःखद घटना घडली या कुटुंबाचे उपजीविकेचे साधन असल्याने ह्या कुटुंबाची फार मोठे नुकसान झाले. यावेळी युवा_उद्योजक_संजुभाऊ_घनवट यांनी पाहणी केली, त्यांचंबरोबर शिवसेना विभाग प्रमुख राजुशेठ गायकवाड, जितेंद्र काळोखे मा सरपंच, बाळासाहेब बुट्टे सरपंच मिरजेवाडी,युवा नेते अमोल ढमाले, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.ह्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या जिल्हा परिषद, महसूल विभाग, शासन यांच्या कडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल असे संजुभाऊ_घनवट यांनी सांगितले.