कडूस ता.खेड येथे कुमंडला नदीवरील पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार- प्रतापराव ढमाले.

  • कडूस ता.खेड येथे कुमंडला नदीवरील पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार- प्रतापराव ढमाले.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

कडूस ता.खेड येथे पावसामुळे कुमंडला नदीला पुर आल्यामुळे कारामळी येथील पुल पाण्याखाली जातो. त्या मुळे कडूस पासून पुढे जाणाऱ्या तीस ते चाळीस गावच्या वाहनांचा संपर्क तुटतो व नागरिकांचे खुप हाल होतात. सदर ठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात.गेली चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे हीच परस्थिती उदभवली होती. हे कळताच कडूस गावचे उदयोजक व सामाजीक कार्यकर्ते प्रतापदादा ढमाले व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व लवकरात लवकर या पुलाची ऊंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रताप दादा ढमाले यांनी ग्रामस्थांना सांगीतले व लोकांना होणारी अडचन दूर करू असे आश्वासन दिले.