कडूस ता.खेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा तिव्र निषेध

कडूस ता.खेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा तिव्र निषेध

कङूस प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कङूस; जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत कङूस शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतिने कङूस परिसर दणानून सोडत कर्णाटक बंगळूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा तिव्र निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां सह शिवप्रेमीनी कङूस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून घोषणांच्या निनादात पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची विटंबना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असा इशारा सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, चेअरमन पंडित मोढवे, अशोक गारगोटे, भैरोनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अभिनाथ शेंडे, उद्योजक प्रताप ढमाले, बाळासाहेब धायबर, बंडूशेठ नेहेरे यांनी दिला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिकेत धायबर गणेश मंडलिक, बारकु गायकवाड, लता ढमाले, सुधाताई पानमंद, शहनाज तुरूक, विजया नाईक, तुकाराम ढमाले, बंडू नेहेरे, बाळासाहेब बोंबले, दत्तात्रेय ढमाले, बबलू शेख, मारुती जाधव, सुदाम ढमाले, माऊली ढमाले, गोरक्ष मुसळे, अनिल जाधव, सागर जाधव, विशाल ढमाले, उत्तम उघडे, संजय धायबर, पिंटू शेळके, रामदास मंडलिक, विजय अरगडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.