कडूस ता.खेड येथे जि.प.प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे राज्यमंञी दत्तामामा भरणे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

कडूस ता.खेड येथे जि.प.प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे राज्यमंञी दत्तामामा भरणे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कडूस(ता:खेड)येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडूस नं.१ येथील जी.ई. इंडिया इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या तर्फे बांधण्यात आलेल्या ४ नविन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा आज बांधकाम, पशुसंवर्धन व दुग्धविकास, वन राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय अशोक शेंडे यांना अभिवादन करण्यात आले.शेळके परिवारातील दुःखद निधन झालेल्या विक्रम शेळके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती अरुण चौधरी, माजी सभापती अरुण चांभारे,उपसभापती वैशाली गव्हाणे, गटविकास अधिकारी अजय जोशी,
पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा कांचन ढमाले,माजी जिल्हा परिषद सदस्या मंगल चांभारे,विलास कातोरे,लक्ष्मण टोपे,पंचायत समिती सदस्या नंदा सुकाळे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे,उद्योजक प्रताप ढमाले,
सरपंच निवृत्ती नेहेरे,चेअरमन पंडित मोढवे,अभिजित शेंडे,ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडलिक, अनिकेत धायबर, जी.ई. इंडिया कंपनीचे पदाधिकारी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षिका यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.