कडूस ता.खेड येथे मानसी ढमाले या विद्यार्थिनीकडून कोरोनाविषयक जनजागृती.

कडूस ता.खेड येथे मानसी ढमाले या विद्यार्थिनीकडून कोरोनाविषयक जनजागृती.
कङूस प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही टळलेला नाही. अशा परिस्थितीत समाजप्रबोधनाच्या कामात आपल्या हातून एखादे छोटेसे कार्य घडावे, यासाठी कङूस येथिल शालेय विद्यार्थीनी मानसी चांगदेव ढमाले हिने कङूस गावात पोस्टर पेन्टिंग लावून गावात विविध ठिकाणी जनजागृती पर पेंटिंग लावले आहे.
कधी सुटेल हा विळखा कोरोनारुपी राक्षसाचा, पिके शेतातच गेली वाया’, ‘सुटला बांध शेतकरीराजाचा घरातच राहून घेऊ काळजी, तेव्हा सुटेल हा विळखा कोरोना राक्षसाचा’, अशी कोरोनामुक्तीच्या दृष्टीने विविध स्लोगन, पेंटिंग असलेली पोस्टर विविध चित्रे, समाजप्रबोधनपर लेखनाची मांडणी करून या माध्यमातून कुंचल्यातून रेखाटली आहेत.
गावातील विविध बाजारपेठेत, हाँटेल, शाळा, चौक, बँक आदी परिसरात लावत त्यातून समाजप्रबोधन करीत कोरोना जनजागृती अभियानात या विद्यार्थीनीने आपला खारीचा वाटा उचलला आहे.
यावेळी सरपंच निवृत्ती नेहेरे, चेअरमन पंडित मोढवे, दामोधर बंदावणे, माजी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव ढमाले, संदिप धायबर, सुदाम ढमाले, कुमार ढमाले, आदी सह नागरिक उपस्थित होते.