कडूस प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा.

कडूस प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा.
कङूस (ता.खेड) येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा वाडा- कङूस जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांच्या हस्ते येथे पार पडला.
ग्रामीण भागातील वृग्णांना वेळेवर आरोग्य केंद्रात पोहचता यावे, योग्य वेळी उपचार मिळावेत या करिता प्रार्थमिक आरोग्य केंद्रासाठी वृग्णवाहिकेची खरेदी करण्यात आली.
कङूस आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या कङूस, दोंदे, चांडोंली, वडगाव पाटोळे, रानमळा, गारगोटवाडी, सायगाव, वेताळे, साबुर्डी, कोहिंडे बुद्रुक, तळवडे, वाशेरे आदी गावपातळीवर ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून व जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्या प्रयत्नातून वृग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षी पासून आरोग्य केंद्राला वृग्णवाहिके अभावी वृग्णांची प्रचंड हेळसांड होत होती. परंतु आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्याने आता आरोग्य केंद्राला वृग्णवाहिका मिळाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेअभावी होणारी हेळसांड थांबणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी सांगितले.
यावेळी सरपंच चंद्रकांत बारणे, प्रमोद शिंदे, सविता बोंबले, शामल तोत्रे, वर्षा बच्चे, सुवर्णा कचाटे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, अमर पाटोळे, रोहिणी दौंडकर, ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, कविता बोंबले, अंजिराम नेहेरे, दत्ताभाऊ कंद, मनोहर बच्चे, संजय टोके, अमोल ढमाले, शारदा कदम, रेखा गारगोटे, वैशाली गारगोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ आरती मुळे, डॉ कुलकर्णी, प्रशांत फुगे, प्रतिभा कारले, गायकवाड, गांगुर्डे, ज्योती जागडे, ग्रामसेवक, आदी सह आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.