कडूस रोडला आगरमाथ्याजवळ दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला.एक जण जखमी!

 1. कडूस रोडला आगरमाथ्याजवळ दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला.एक जण जखमी!

  निवृत्ती नाईकरे पाटील
  मु.पो.ग्रामीण.

  आगरमाथा (ता.खेड) कङूस आगरमाथा येथिल भवानजी बुवा मंदीरा शेजारी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सोमवार दि.९ रोजी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कङूस गावातील तरुणांवर हल्ला करत जखमी केले.
  राजगुरूनगर हून कङूस कडे जाणाऱ्या दुचाकी स्वार आगरमाथा येथून चालले असताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला केल्याने एकाच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.
  या व्यक्तीनी आरडाओरडा करत प्रतिकार केल्याने बिबबट्याने धूम ठोकली पायाला जबर दुखापत झाल्याने या तरुणांना खेड येथिल खाजगी दवाखान्यात नेण्यात आले आहे.
  आगरमाथा परिसरात शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने परिसरात दिवसेंदिवस दहशत वाढतच चालली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
  परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे बिबट्याचे आता दर्शन होऊ लागल्यामुळे नागरिक शेतकरी पशुपालकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.