कमानमध्ये स्वातंत्र्य दिनी कोविड-19 लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद…

कमानमध्ये स्वातंत्र्य दिनी कोविड-19 लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद…

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कमान ता खेड येथे आज भारतीय स्वातंत्र्य दिनी कोविड- 19 लसीकरण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.आज कमान व परिसरातील सुमारे एकशे दहा नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.आज सकाळी संपन्न झालेल्या ध्वजारोहणानंतर सुरू झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी कोणताही गोंधळ न करता उत्तम सहकार्य केले.
नेट सेट परीक्षा उमेदवार, पोलिस भरतीचे उमेदवार,अकॅडमीचे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना आज विशेष प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. त्यानंतर आज उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.याकामी कमान ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश नाईकरे उपसरपंच मोनिकाताई नाईकरे सदस्य मच्छिंद्रशेठ रोकडे बारापाटी शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी पूर्ण वेळ देऊन उपस्थित राहून विनातक्रार लसीकरणासाठी नागरिकांना व आरोग्य विभागाच्या पथकाला सहकार्य केले.आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी आरोग्य सेवक श्री सानप व आरोग्य सेविका श्रीमती दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धारित वेळेत हा उपक्रम पूर्ण केला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या गावातील लसीकरण कार्यक्रमाला सहकार्य करणा-या सर्व संबंधितांचे सरपंच योगेश नाईकरे यांनी आभार मानले.