कमान ता.खेड येथील लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप.

कमान ता.खेड येथील लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कमान ता.खेड येथे खावटी किट वाटप पार पडले.
यात अन्नधान्य,कडधान्य व इतर जीवनावश्क वस्तूचे वाटप करण्यात येत. यामुळे आदिवासी समाजातील गरजू व्यक्तींना याचा शासनातर्फे आधार मिळाला आहे. कमान येथे खावटी योजनेच्या लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप सरपंच योगेश नाईकरे व उपसरपंच मोनिकाताई नाईकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक रविंद्र पाटील यासह लाभार्थी उपस्थित होते.