कमान ता.खेड येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त सरपंच अशोक नाईकरे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या पाण्याची टाकी व पाझर तलावाच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले.

कमान ता.खेड येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त सरपंच अशोक नाईकरे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या पाण्याची टाकी व पाझर तलावाच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी जि.परिषद निधीतून पाण्याच्या टाकीचे काम मंजूर केले होते.या कामाचे भुमीपुजन ऊदयोजक संदिपशेठ घनवट यांच्या हस्ते करण्यात आले.तर पाझर तलावाचे काम टाटा हॕंड्रिक्सन चाकण या कंपनीचे देविदास सपाट यांनी कंपनीच्या सामाजीक निधीतून मंजूर करून आणले.या कामाचे भूमीपुजन देवीदास सपाट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संदिपशेठ घनवट,राजगुरूनगर सहकारी बॅकेच्या माजी अध्यक्षा विजयाताई शिंदे,सरपंच अशोक नाईकरे यासह नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.