कमान ता.खेड येथे शिवराज्यभिषेक सोहळा उत्सहात साजरा.

कमान ता.खेड येथे शिवराज्यभिषेक सोहळा उत्सहात साजरा.

चासकमान प्रतिनीधी
मु.पो.ग्रामीण.
महाराष्ट्रभर शिवराज्यभिषेक सोहळा उत्सहात साजरा होत असताना कमान ग्रामपंचायतने सुद्धा शिवराज्यभिषेक सोहळा उत्सहात साजरा केला.शासकीय नियमानुसार भगवाध्वज उभा करून,ध्वजाचे व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी सरपंच योगेश नाईकरे, युवा उपसरपंच मोनिका नाईकरे,युवा ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईकरे,रघुनाथ नाईकरे,गणेश नाईकरे,ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत नाईकरे,चंद्रकांत नाईकरे हे उपस्थित होते.कमान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श व उपक्रमशील मुख्याध्यापक संजय नाईकरे यांचे ध्वजाचे शास्रोक्त पद्धतीने उभे करण्यासाठी सहकार्य लाभले.ध्वजाचे व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केल्यानंतर शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या.