कमान येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानची आमदार निलेश लंके यांच्या कोव्हिड सेंटरला भरीव मदत.

कमान येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानची आमदार निलेश लंके यांच्या कोव्हिड सेंटरला भरीव मदत
नवनाथ नाईकरे
प्रतिनीधी चासकमान
चास कमान येथील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या शिव साम्राज्य प्रतिष्ठान चे कार्यकर्ते यांनी 21/5/2021 रोजी आमदार निलेश लंके यांच्या श्री शरद चद्र पवार साहेब कोविड मंदिर भाळवनी या ठिकाणी भेट दिली. आपण समजाचे देणं लागतो या भावनेतून काम करणारे आमदार निलेश लंके साहेबाना त्यांच्या कामामुळे संपूर्ण देश ओळखू लागलाय. आणि याच भावनेतून काम करणा ऱ्या कमान येथील शिव साम्राज्य प्रतिष्ठान ने या कोविड सेंटर ला मदत देऊ केली.यात 100किलो गहू,50किलो तांदूळ, दोन कॅरेट केळी,2 कॅरेट टोमॅटो, बटाटे व अन्य भाजीपाला याचा समावेश होता..ही सर्व मदत शिवसाम्रज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईकरे, पाटबंधारे विभागात कार्यरत असणारे राजेद्र नाईकरे सामाजिक कार्यकर्ते श्रीराम सपाट, माजी अध्यक्ष अविनाश नाईकरे, सामाजीक कार्यकर्ते श्रीकांत नाईकरे,राजू नाईकरे,शुभम नाईकरे,सोन्या उर्फ शुभम नाईकरे यांनी पोहचविण्याचे काम केले.