कमान येथे टाटा आॅटोकाॅम्प कंपनीच्या अर्थसाह्यातून पुर्ण झालेल्या साकव पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

कमान येथे टाटा आॅटोकाॅम्प कंपनीच्या अर्थसाह्यातून पुर्ण झालेल्या साकव पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

टाटा आॅटोकाॅम्प हेंड्रिक्सन सस्पेशन्स प्रा.लि.चाकण पुणे यांच्या अर्थसहायातून CRS फडांतून कमान ता.खेड येथे १ कोटी ११ लक्ष रूपयाची समाजउपयोगी कामे पुर्ण झाली असून,साकवपुलाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि.२८रोजी कंपनीचे अधिकारी श्री.जे व्ही.एन राव यांच्या हस्ते पार पडला.
कंपनीने कमान गावात सोलर प्रोजेक्ट ३२ लक्ष,अंगणवाडी इमारत २४ लक्ष,मुलांची खेळणी २ लक्ष,साकवपुल १३ लक्ष,तलाव नुतनीकरण ४० लक्ष,असे १ कोटी ११ लक्ष रूपयाची समाजउपयोगी कामे पुर्ण केली आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे,वाडा-कडूस गटाचे आधारस्तंभ संदिपशेठ घनवट,कमानचे युवा सरपंच योगेशशेठ नाईकरे,माजी सरपंच अशोक नाईकरे,ग्रामपंचायत सदस्या पुष्पा नाईकरे,इंदुमती नाईकरे,युवा सदस्य मच्छिंद्र रोकडे,सदस्य सतिषशेठ नाईकरे,माजी उपसरपंच प्रविण नाईकरे,राहुल कल्हापुरे,देवीदास सपाट,सावळेराम नाईकरे,हरीशेठ नाईकरे,तान्हाजी नाईकरे,गुलाब नाईकरे,रामकृष्ण नाईकरे , संदीप नाईकरे सोमनाथ सपाट, पप्पू राक्षे, बबनराव राक्षे,कंपनीचे अधिकारी यासह ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श मुख्याध्यापक सुरेश नाईकरे सर यांनी केले तर आभार देवीदास सपाट यांनी मानले.