कर्तृत्ववान माजी विद्यार्थी ही शाळेची मौल्यवान संपत्ती-शिवाजीराव दुंडे.

कर्तृत्ववान माजी विद्यार्थी ही शाळेची मौल्यवान संपत्ती-शिवाजीराव दुंडे.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

वाडा ता खेड.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अॅड.राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते पर्यावरणप्रेमी शिक्षक संजय नाईकरे व खेड पंचायत समिती चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या त्यांच्या सहकारी व उपक्रमशील शिक्षिका सौ वैशाली नाईकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.बारापाटी कमान शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांच्या हस्ते डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.हे शिक्षक दांपत्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी कमान येथे कार्यरत असून दोघेही कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव दुंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून उपस्थितांना या शिक्षक दांपत्याच्या उल्लेखनीय
शैक्षणिक व सामाजिक कार्याचा परिचय करून दिला.यावेळी बोलताना ते म्हणाले की,’शाळा आणि विद्यार्थ्यांचे नाते आजन्म टिकणारे नाते असते.तसेच कर्तृत्ववान माजी विद्यार्थी ही ख-या अर्थाने शाळेची मौल्यवान संपत्तीच असते.व त्यांच्या प्रभावशाली कार्यामुळे समाजाची जडणघडण होत असते.’ यावेळी शाळेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या इतरही सर्व माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
*विद्यार्थ्यांशी एकरूपता साधण्याची कला शिक्षकांनी आत्मसाथ केल्यास शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख निश्चितपणे उंचावतो…* असे प्रतिपादन बारापाटी कमान शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी सत्काराला उत्तर देताना केले आहे.मागील भेटीत त्यांनी
या शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श सदैव विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर राहावा म्हणून एखादे सुंदर स्मृतीस्थळ असावे अशी संकल्पना मांडली होती.
याची महाविद्यालयाने तात्काळ दखल घेत ही कल्पना पूर्णत्वास आणली आहे.याप्रसंगी नवीन स्मृतीस्थळाची सर्व माजी विद्यार्थ्यांनी पाहणी केली.
या नाविन्यपूर्ण उपक्रमातील स्मृतीस्थळाच्या सुशोभन करण्यासाठी देखील माजी विद्यार्थ्यांनी यथाशक्ती
सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी प्राचार्य शिवाजीराव दुंडे पर्यवेक्षक सतीश हाके वाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिल केदारी
प्रा. योगिता देवतळे प्रा. शितल कहाणे,प्रा.सुवर्णा शेलार,प्रा. दिलीप बच्चे,प्रा.पावडे सर
संजय येवले,व शालेय शिक्षक वृंद व सर्व कर्मचारी उपस्थित होते.