कान्हेवाडी बुद्रुक येथील भूमिहीन आदिवासींना निवारा!मा.आदर्श उपसरपंचानी केले भुमीदान!

कान्हेवाडी बुद्रुक येथील भूमिहीन आदिवासींना निवारा!मा.आदर्श उपसरपंचानी केले भुमीदान!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

कान्हेवाडी बुद्रुक येथील आदिवासी ठाकर समाजाच्या लोकांना घर बांधण्यासाठी जमीन नव्हती.कान्हेवाडी गावचे माजी आदर्श उपसरपंच मारुतीशेठ सहाणे यांनी आपली पाच गुंठे जमीन दान म्हणून दिली. सदर जमिनी मध्ये आदिवासी ठाकर समाजातील लोकांनी  बांधली. सदर घरकुलांना भेट देऊन अॅड अरूण मुळूक (अध्यक्ष, खेड तालुका लिगल सेल) यांनी आदिवासी ठाकर समाजाला शुभेच्छा दिल्या व मारुती सहाणे यांनी मोफत जागा दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद दिले. यावेळी अॅड अरूण मुळूक, कान्हेवाडी चे माजी सरपंच मारुती सहाणे,अॅड शंकर कोबल, दिगंबर मुळूक, समीर मुळूक इत्यादींसह आदिवासी बांधव उपस्थित होते. स्वतःची घरकुले झाल्याने आदिवासी लोकांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून येत होते.