कान्हेवाडी बु.सहाणेवाडी व कडधे येथील शाळांना स्मार्ट टि.व्ही.ई-लर्नींग चे वितरण.

कान्हेवाडी बु.सहाणेवाडी व कडधे येथील शाळांना स्मार्ट टि.व्ही.ई-लर्नींग चे वितरण.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

आज सोमवार दिनांक 28/06/2021रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेवाडी बु.येथे शाळा दुरूस्ती कामाचे उदघाटन व शालेय परिसरात वृक्षारोपण, तसेच जि.प.निधीतून कमान केंद्रातील कान्हेवाडी,सहाणेवाडी,कडधे या शाळांना स्मार्ट टि.व्ही(ई-लर्नीग)चे वितरण
आदर्श व कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या मा.सौ.तनुजाताई घनवट यांचे शुभहस्ते व खेड तालुक्याचे
कार्यक्षम व प्रेरणादायी गटशिक्षणाधिकारी मा.श्री.संजयराव नाईकडे साहेब, वाडा बीटचे आदर्श विस्तार अधिकारी मा.श्री.जीवनजी कोकणे साहेब, केंद्रप्रमुख श्री.एकनाथ लांघी साहेब, विषयतज्ज्ञ शिंदे सर ,देशमुख सर,आपाणे सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला
सदर कार्यक्रम प्रसंगी आदर्श गाव कान्हेवाडी नगरीचे सरपंच श्री.बी.डी.कोबल,उपसरपंच सुभाषराव पारधी,ग्रामपंचायत सदस्या ऊर्मिला ताई रूके,मनिषाताई थोरात, संतोष आंबेकर,विशालभाऊ शिंदे,शाम आबेंकर, दत्ताशेठ रूके, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा.सौ.शुभांगीताई कोबल व सर्व सदस्य तसेच कमान केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.या निमित्ताने कान्हेवाडी शाळेत कमान केंद्रातील सर्व शिक्षकांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्यासाठी तंञस्नेही शिक्षक श्री.हरिष हजारे व तुषार वाटेकर यांनी मार्गदर्शन केले.सर्व कार्यक्रम कोवीड-19 चे शासकीय नियम पाळून पार पडला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन व संयोजन कान्हेवाडी उपक्रमशील मुख्याध्यापक श्री.सुरेशराव नाईकरे यांनी केले.