कारमाळी येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कृषीरत्न सोशल फांऊडेशनची ४० हजार रूपये मदत.

कारमाळी येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कृषीरत्न सोशल फांऊडेशनची ४० हजार रूपये मदत.
गारगोटवाडी गावातील कारामळी येथील नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवाना कृषीरत्न सोशल फांऊडेशन च्या माध्यमातून एक हात मदतीचा म्हणून सर्व टिम ने पुढाकार घेऊन तब्बल40,000 हजार रूपये धनादेश एकत्रित करून 26/4/2021रोजी श्री अरूण धोडिंबा काळोखे यांच्या गायी गोठा कारामळी गारगोटवाडी या ठिकाणी येऊन जनावरांची माहिती घेऊन रक्कम चेक स्वरूपात श्री अरूण काळोखे यांच्याकडे स्वपुर्त केली.

मानवाधिकार मिडीया फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आपला माणुस जनतेचा सेवक श्री दत्ताभाऊ कंद पाटील यांनी सबंधीत घटना सोशल मिडीयावर टाकली होती.

यावेळी कृषीरत्न सोशल फांऊडेशन टिमचे फौजी स्वप्निल पाटोळे फौजी संभाजी करंडे फौजी संभाजी हुडांरे रितेश पाटोळे सागर करंडे प्रसाद करंडे यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी गारगोटवाडी गावच्या सरपंच वर्षाताई बच्चे उपसरपंच रोहिणीताई काळोखे ग्रामसेविका प्रतिभा डोगंरे राजश्री ढोरे जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष श्री मनोहर बच्चे अमुल दुध डेअरी अध्यक्ष अतुल गारगोटे जनकल्याण प्रतिष्ठाण खजिनदार अँड माणिक गारगोटे शंकुतला पोलट्री फार्म चे मालक दत्तात्रेय गारगोटे सुभाष कंद पोलीस पाटील नवनाथ काळोखे पाटील मानवाधिकार मिडीया फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आपला माणुस जनतेचा सेवक श्री दत्ताभाऊ कंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.