कारामळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडून तातडीची मदत

कारामळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडून तातडीची मदत.

कडूस  प्रतिनीधी- गारगोटवाडी गावातील कारामळी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी भेट घेऊन तातडीची मदत केली

कडूस जवळील गारगोटवाडी गावातील कारामळी येथील रहिवासी श्री अरुण काळोखे यांचा जनावरांचा गवत सरमाडाचा उभारलेल्या गोठ्याला तारीख 23 एप्रिल रोजी आग लागून आगीमध्ये 2 गाई जागीच जळून खाक झाल्या. काही जनावरे आगीतून बाहेर काढण्यात आली. सर्व गाई व वासरे आगीत होरपळलेली असल्याने त्यांचे डोळे जळून गेले असल्याने,सड जळालेले असल्याने,जनावरांची चमडी जळालेली असल्याने सदरची जनावरे जगण्याची अजिबात शाश्वती नाही. या घटनेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,मा.सभापती अरुणशेठ चांभारे यांनी पाहणी करून काळोखे परिवाराला वैयक्तिक 15000/- रोख मदत देण्यात आली. तसेच पुणे जिल्हा परिषद व शासनाकडून झालेल्या नुकसानीबाबत मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,मा.सभापती अरुणशेठ चांभारे,पु.जि.प.मा.सदस्य अशोकभाऊ शेंडे,ज्येष्ठ विधिज्ञ अॅड सुखदेव तात्या पानसरे,राष्ट्रवादी लिगल सेल खेड अध्यक्ष अॅड अरुण मुळूक,कडूस गावचे सरपंच निवृत्ती नेहेरे,उपसरपंच कैलास मुसळे,सोसायटीचे चेअरमन मोडवे,अभिजित शेंडे सर,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोहिनकर,डॉ.पोखरकर,पत्रकार तुषार मोडवे,गणेश आहेरकर व पोलीस पाटील काळोखे उपस्थित होते.