कारामळी येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची उदयोजक प्रताप ढमाले यांनी भेट घेवून सांत्वन केले.

कारामळी येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची उदयोजक प्रताप ढमाले यांनी भेट घेवून सांत्वन केले.
काल गारगोटवाडी गावातील कारामळी येथिल रहिवासी श्री अरूण काळोखे यांचा दुग्ध व्यवसाय मधे 7 गाई 2 वासरे असा जनावरांचा गवत सरमाडाचा उभारलेला गोठा होता गोठ्या वरती काळोखे परिवारातील कोणीच उपस्थित नव्हते आचानक गोठ्याला आग लागलेली शेजारील शेतीमधील लोकांनी पाहिले आरडा ओरडा झाला काळोखे परिवारातील व्यक्ती गोठ्यापर्यंत पोहचेपर्यंत 2 गाई जागीच जळून खाक झाल्या तर काही गाई जनावरे आगीतुन दावी सोडुन बाहेर काढण्यात आल्या परंतु सर्व गाई वासरे आगीत होरपळलेली आहे गोठा पहाणी करताना या मुक्या जनावरांचा काय दोष असा प्रश्न मनात आला गाई वासरे खुप जखमी झाले आहे पहावत नाही उद्या जखमी जनावरे जगतील की नाही यांची गँराटी नाही कारण जखमी गाई चे डोळे जळून गेले आहे काही गाईचे दुधाचे सड जळाले आहे तर काही जनावरांचे चमडी सुध्दा जळाली आहे अशी वेळ कुणा शेतकरी परिवारावर येऊ नये परंतु नियतिने काळोखे परिवारावर यांच्या गाई गोठ्यावर घाला घातला अत्यंत वाईट वेळ अत्यंत दु:खंत घटना या कुटुंबावर आली आहे आपण सर्वांनी या कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून समाजातील सर्व क्षेत्रातील लोकप्रतिनिधी नी शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे हि नम्र विनंती
*आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आणि सदर काळोखे परिवाराचे सांत्वन करण्यासाठी तसेच सरकारी कारवाई मध्ये मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन याठिकाणी देण्यात आले या वेळी माझ्यासमवेत उपस्थित मध्ये अभिजीत शेंडे सर, विशाल तुकाराम ढमाले ,गणेश मंडलिक ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर पोखरकर पशु वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील नवनाथ काळोखे, उपस्थित होते*
*सदैव आपला*
*प्रताप ढमाले*