केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेत गणिताच्या आदर्श पाठाचे सादरीकरण.

केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेत गणिताच्या आदर्श पाठाचे सादरीकरण.

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

निपुण भारत अभियान अंतर्गत खेड तालुक्यातील कमान केंद्राची ऑक्टोबर महिन्याची शिक्षण परिषद खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
यावेळी बारापाटी कमान शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वैशाली मुके यांनी विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्यासह गणित विषयाच्या आदर्श पाठाचे सादरीकरण केले.शिक्षकांनी सर्वात आधी प्रत्येक विद्यार्थी समजावून घेणे आवश्यक असण्याचे महत्त्व अधोरेखित करतानाच अध्यापना दरम्यान शिक्षक व विद्यार्थी आणि विद्यार्थी व विद्यार्थी अशी होणारी आंतरक्रिया ही तितकीच महत्त्वाची असते याकडे ही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
केंद्रप्रमुख एकनाथ लांघी यांनी ही यावेळी केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन केले.शाळेचा परिसर आकर्षक रांगोळी काढून व त्यावर पणत्यांची रोषणाई करून सुशोभित करण्यात आला होता.
कान्हेवाडी ठाकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय घुमटकर यांनी उपस्थितांचे वही पेन देऊन स्वागत केले.तसेच केंद्रातील सर्व शाळांना पुष्पगुच्छा ऐवजी रद्दीतील सोनं हे पुस्तक भेट देण्यात आले.
आजचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून वैशाली मुके,पूनम मुळूक,विजया मोहिते,सचिन गडदे यांनी पाठासंदर्भात अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्याचा वापर, विद्यार्थी व शिक्षक आंतरक्रिया,
स्वाध्याय व मूल्यमापन इ.घटकांच्या संबंधाने सविस्तर मार्गदर्शन केले.
सर्व शिक्षकांनी प्रतिकात्मक फटाके व फुलबाजे वाजवून दिपावलीचे स्वागत केले.
सहाणेवाडी व कान्हेवाडीची ठाकरवाडी या शाळांतर्फे स्नेहभोजन देण्यात आले.
ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी सहाणेवाडी शाळेचे मुख्याध्यापक शंकर बुरसे, ठाकरवाडी कान्हेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय घुमटकर व गोरक्ष मुळूक यांनी परिश्रम घेतले.सहशिक्षिका वैजयंता नाईकडे यांनी आभार मानले.